जीव्हीके समूहावर सीबीआयचे छापे; मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार

 

 

नवी दिल्ली- मुंबई विमानतळाच्या व्यवहारांमध्ये सुमारे 705 कोटी रुपयांच्या अनियमिततेसंदर्भात जीव्हीके समूहाचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी गुणपती यांच्याविरोधात सीबीआयने प्रकरण दाखल केले

असून मुंबई आणि हैदराबादेत जीव्हीके समूहाच्या कार्यालयांवर छापेही घालण्यात आले आहेत. सीबीआयने बुधवारी हे छापे घातले आणि संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती.

हे प्रकरण “मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’च्या 705 कोटी रुपयांच्या अफरातफरीशी संबंधित आहे. जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया आणि अन्य

गुंतवणूकदारांच्यात खासगी-सरकारी भागीदारी तत्वावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा (एमआयएएल)चे व्यवस्थापन केले जात आहे. वाढीव खर्च दाखवून आणि महसूलात घट दाखवून हा अपहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात सीबीआयने गुणपती, “एमआयएएल’चे संचालक, त्यांचे पुत्र जी.व्ही.संजय रेड्डी, “एमआयएएल’चे व्यवस्थापकीय संचालक. “एमआयएएल’ कंपनी, “जीव्हीके एअरपोर्ट होल्डींग लिमिटेड’ कंपनी आणि अन्य 9 खासगी कंपन्यांच्याविरोधात आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.