पुणे – तळवडे येथील आगीच्या दुर्घटनेतील एका रूग्णाची प्रकृती सुधारत असून, अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहे. त्यामध्ये तीन रूग्ण जास्त भाजल्यामुळे आणि त्यांच्या फुफ्फुसात स्पार्क गेल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती ससून रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
आगीच्या दुर्घटनेतील दहा रूग्णांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ महिला आणि पुरूष असून, त्यातील पाच जण ८० ते ९५ टक्के तर तीन जण ५० ते ७० आणि दोघेजण २० ते ४० टक्के भाजले. त्यामध्ये ८० ते ९५ टक्के भाजलेल्यापैकी दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ३० ते ४५ टक्के भाजलेल्या महिलेच्या फुफ्फुसामध्ये इजा झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतीन तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तर उर्वरित चार जणांवर सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार सूरू आहेत.
“जखमींमध्ये काही रुग्णांचे फुप्फुसांना इजा झाली असून त्यांना अॅन्टीबायाेटिक व सपाेर्टिव्ह केअर देणे सूरू आहे. एका रूग्णांची प्रकृती सुधारत आहे.”- डाॅ. विनायक काळे – अधिष्ठाता ससून रूग्णालय