50 परिसरांचा नव्याने समावेश : आता एकूण 109 क्षेत्र कंटेन्मेंट झोन
पुणे – शहरामध्ये करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ झाली आहे. शहरात नव्याने 50 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र महापालिकेने जाहीर केले असून, त्यामुळे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 109 झाली आहे. तर, 9 क्षेत्रांत बदल करण्यात आला आहे.
या नवीन नियमांबद्दल महापालिका प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा माहिती जाहीर केली. या नव्या क्षेत्रांत करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्साने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कसबा -विश्रामबागवाडा : क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या राजेंद्रनगर मनपा कॉलनी, पर्वती दर्शन चाळ नंबर 67,70,93,99,107 साई बाबा वसाहत परिसर, म्हात्रे पूल ते म्हसोबा चौक हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
ढोले पाटील रोड : घोरपडी शक्तीनगर परिसर, ढवळे वस्ती, हडसपर स.न.124,282, मुंढवा घोरपडीजवळील भिमनगर परिसर.
धनकवडी-सहकारनगर : पर्वती, बापुजीनगर समोरील पद्मावती वसाहत. अरण्येश्वर-तावरे कॉलनी परिसर, सलोखा अपार्टमेंट, शाहू कॉलेज रोड, धनकवडी प्रतिक्षा बंगला जगदीश सोसायटी, कात्रज येथील अय्यप्पा मंदिराजवळील राजगड सोसायटी, शिवशंकर कॉलनी लेन नंबर 5, आंबेगाव बुद्रक साईलीला अपार्टमेंट हे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असेल.
बिबवेवाडी : कोठारी ब्लॉक्सजवळील बिबवेवाडी ओटा वसाहत, अप्पर इंदिरानगर व्हीआयटी कॉलेज परिसर. येरवडा क्षेत्रीय कार्यालयंतर्गत अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, लक्ष्मीनगर, रामनगर, यशवंतनगर, नेताजीनगर. नवी खडकी, गवळीवाडा, सुभाषनगर , शनीआळी परिसर, नागपूर चाळ, कोकण गल्ली.
वानवडी-रामटेकडी : हडपसर येथील लक्ष्मीनगर प्रभाग क्र.25 रेल्वे लाईन जवळील परिसर, घोरपडी ढोबरवाडी प्रभाग क्रमांक 28 सरदार मुदलियार शाळेजवळील परिसर.
शिवाजीनगर-घोलेरोड : वाकडेवाडी संभाजीनगर पीएमसी कॉलनी चाळ नंबर 10, औंध सर्व्हे नंबर 78,79,80 इंदिरा वसाहत मारुती मंदिरामागे, 1102 शिरोळे वस्ती, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असेल, असे पालिकेच्या नव्याने जाहीर केलेल्या आदेशांत म्हटले आहे.