सातारा – जिल्ह्यात करोनाटा कहर सुरूच असून बुधवारीही जिल्ह्यातील 63 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या 1107 झाली आहे.
कोरेगाव तालुक्यातील जांब येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला असून तो करोनाबाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील तिघांनी आज करोनावर मात केली. तर 298 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 293 जणांचा नुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्या 14 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी बुधवारी सायंकाळी दिली. यामध्ये निकट सहवासातील 10 व प्रवास करुन आलेले 2, आयएलआय 2 अशा 14 जणांचा समावेश आहे. तसेच तिघांना 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बाधित 14 जणांमध्ये पाटण तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला, माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी, वाई तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला व 28 वर्षीय पुरुष, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 48 जणांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती बुधवारी सकाळी देण्यात आली. यामध्ये निकट सहवासातील 37, प्रवास करुन आलेले 5, “सारी’चे 5, आयएलआयचा 1 अशा 48 जणांचा समावेश आहे. या 48 जणांमध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22, 54, 32, 40, 35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60, 44 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठेतील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23, 45, 70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36, 34 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
तसेच पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकरवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठेतील 39 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील पाटोळे खडकी येथील 62 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कान्हरवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22, 24, 32, 25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचाही त्यात समावेश आहे. पुण्यातील एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 298 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 50, कृष्णा मेडिकल कॉलेजधील 61 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 70, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 30, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 अशा एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.