नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पडत असताना देखील भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच आता देशभरातील इंधनाच्या वाढत्या किंमतींवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात आलंय.
इंधनाच्या किंमती कमी करून कोरोना संकटात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचे काम भाजप सरकार करेल का? यालाच अच्छे दिन म्हणायचं का? असे प्रश्न उपस्थित करत आज काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इंधन व डॉलरच्या वाढत्या मूल्याचा दाखल देत उपहासात्मक निशाणा साधलाय.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत गौरव वल्लभ यांनी, ” आणखी एक कामगिरी! मोदीजी देशाचे पहिले असे पंतप्रधान बनलेत, ज्यांचं वय, प्रति लिटर पेट्रोल, प्रति लिटर डिझेल व प्रति डॉलरच्या तुलनेत रुपया या तिन्हींच्या किंमतीपेक्षा कमी आहे” असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय.
एक और उपलब्धि
मोदी जी देश के पहले प्रधानमंत्री बन गये है, जिनकी उम्र प्रति लीटर पेट्रोल की क़ीमत, प्रति लीटर डीज़ल की क़ीमत व प्रति डॉलर रुपये की क़ीमत तीनों से ही कम है।#SpeakUpAgainstFuelHike— Prof. Gourav Vallabh (@GouravVallabh) June 29, 2020