खरीप पिकाला दिलासादायक पाऊस
बेल्हे(प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे व परिसरात सोमवार (दि.२९) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उकाडा जाणवत होता. तसेच या भागातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1256025334737169/
शेतात पेरलेल्या सोयाबीन, बाजरी,तूर,मूग,उडीद व इतर खरीप हंगामातील पिकाला या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला असल्याने बळीराजा आनंदी दिसत आहे.