मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज्यभरातून गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. तर राष्ट्रवादी युवा काँग्रेसनी गोपीचंद पडळकरांचे तोंड काळे करण्याची धमकी दिली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाजपाच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लागला तरी आम्ही जशास तसे उत्तर देवू, असा इशारा राष्ट्रवादीला दिला आहे.
निलेश राणे म्हणाले कि, मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा. जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला.
मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. पडळकरांच्या त्या वक्तव्याचं समर्थन मी करत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किव्हा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 24, 2020
दरम्यान, गोपीचंद पडळकर ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला कळालं. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या नेत्यांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार. काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलतोय हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, अशी प्रतिक्रीया शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी दिली होती.