पुणे – आजारी मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एन. भळगट जामीन 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.
अनिरुध्द आनंद गायकर (वय 30) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. हेमंत झंजाड यांनी काम पाहिले.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी गायकर याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यावेळी अॅड. हेमंत झंझाड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
संबंधित प्रकार हा नजरचुकीने झालेला असून, डॉक्टरांचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. याखेरीज, गायकर यांनी महिलेची माफी सुद्धा मागितली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला.