बंगळुरू – कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या निकटच्या नातेवाईकाला करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर आज हे कार्यालयच सॅनिटायझेशन करण्यासाठी सील करण्यात आले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील एक महिला कर्मचाऱ्याच्या पतीला करोना झाल्याचे निदान झाल्यामुळे संपूर्ण कार्यालयचे बंद करून सॅनिटायझेज्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच हे कार्यालय आहे.
त्यामुळे येडीयुरप्पा यांनी आज आपल्या तेथील कार्यालयाऐवजी विधान सौधमधील कार्यालयांमध्ये आज आपले कामकाज केले व बैठका घेतल्या. राज्य सरकारकडून करोनाच्या संबंधात अधिक सजगपणे उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे कोणताही धोका नको म्हणून मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानालाच बंद करून तेथे औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. याचप्रमाणे बंगळुरूचे रेल्वे विभागाचे कार्यालयही तेथील एका कर्मचाऱ्याला करोना झाल्यामुळे बंद करावे लागले आहे.