मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंकेपाठोपाठ झिम्बाब्वे दौराही रद्द करण्याची माहिती बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात 3 एकदिवसीय व एक टी-20 सामना खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार होता. तसेच ऑगस्ट महिन्यात संघ झिम्बाब्वेचाही दौरा करणार होता. या दौऱ्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार होती. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने हे दोन्ही दौरे बीसीसीआयने शुक्रवारी अधिकृतरीत्या रद्द केले आहेत.