हैदराबाद- लॉकडाऊनमुळे रिऍल्टी क्षेत्र अडचणीत असतानाच काही सिमेंट कंपन्यांनी आपल्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याची तक्रार विकसकांनी केली असतानाच तेलंगणा राज्यातील सिमेंट उत्पादकांनी किमतीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे.
त्याचबरोबर तेलंगणातील सिमेंट उत्पादकांनी राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनासाठी पुढील तीन वर्ष 230 रुपये प्रत्येक दराने सिमेंट पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. इतर बाजारपेठेसाठी सिमेंट किमतीत घट करण्याचे संकेत सिमेंट कंपन्यांनी दिले असल्याचे तेलंगणा सरकारने म्हटले आहे.