सांगली (प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यात आणखी चौघांना करोनाची लागण झाली. वाळवा आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी दोघांना करोनाची बाधा झाली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०६ इतकी झाली आहे. ८८ जणांवर मिरज करोना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाळवा तालुक्यातील येलूर येथील २६ वर्षीय आणि ४१ वर्षीय महिला तर शिराळा तालुक्यातील रिळे येथील १३ वर्षाचा मुलगा आणि मणदूर येथील १६ वर्षाची मुलगी अशा चौघांना शुक्रवारी करोनाची लागण झाली. दरम्यान, खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील ६० वर्षीय वृद्धास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
कवठेमहांकाळ येथील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, कडेबसरी ता . सांगोला जि. सोलापूर येथील ४८ वर्षाचा पुरुष, खिरवडे ता . शिराळा येथील ५६ वर्षाचा पुरुष आणि मणदूर ता. शिराळा येथील ८१ वर्षाच्या पुरुषाने करोनावर मात केली आहे . आजपर्यंत १११ जणांनी करोवर मात केली आहे .