वेल्हे -अतिदुर्गम वेल्हे तालुक्यातील करोना संशयित रुग्णांना तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात घेऊन जावे लागते. यासाठी वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी वेल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू केले होते. या सेंटरमध्ये मंगळवारी (दि. 9) रुग्णांचे स्वॅब नमुने घेणे सुरू केले. येथील संशयित रुग्णांचा नमुना घेण्यात आला. साखर येथे महिलेला लागण झाली होती. या महिलेच्या संपर्कातील सातजणांचे स्वॅब घेतले होते.
मंगळवारी (दि. 9) त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगडे मोसे येथील एका गरोदर महिलेला लागण झाली होती. बाधित महिलेच्या संपर्कातील आसनी दामगुडा येथील एक संशयित अशा बारा जणांना तपासणीसाठी दाखल केले आहे. वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर म्हणाले, निगडे मोसे येथील 11 व आसनी दामगुडा एक अशा 12 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.