कोलंबो – पाकिस्तानच्या उमर अकमलवर बंदी लावली गेल्यानंतर आता श्रीलंकेच्या तीन खेळाडूंची मॅच फिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यात आल्याने पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ज्या खेळाडूंची चौकशी झाली आहे ते सध्याच्या श्रीलंका संघात नसून माजी खेळाडू असल्याचे संकेत श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले आहेत.
शेहान मधुशंका या क्रिकेटपटूला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाला धक्का बसला आहे. या खेळाडूंची चौकशी श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या परवानगीने झाली असली तरीही त्यात आयसीसीच्या पथकाकडूनच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा गरज भासल्यास या खेळाडूंची चौकशी करण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
शोएबला समन्स….
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कायदे सल्लागार तौफीक रिझवी यांच्यावर टीका केल्या प्रकरणी माजी कसोटीपटू शोएब अख्तर याला देशाच्या प्रमुख तपास यंत्रणेने (एफआयए) समन्स बजावले आहे. शोएबला जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले आहे.