नवी दिल्ली: करोना व्हायरसचं संकट सुरु असताना निसर्ग वादळाने घातलेल्या थैमानानंतर आता आणखी एक संकट येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे. अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा ऍस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचे काय परिणाम होतील याबाबत मात्र अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
नासाने म्हटले आहे की, हा लघुग्रह जून महिन्यात पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव “2002 एनएच फोर’ असे असल्याचे म्हटले आहे. हा लघूग्रह 6 जून रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार असून त्याचा व्यास 250 ते 570 मीटर इतका आहे. हा लघुग्रह ईडीटी (युरोपीयन वेळेनुसार) 12 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून 5.1 दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे.
एका मैदानाएवढ्या आकाराचा का विशाल लघुग्रह आहे. संशोधकांचा दावा आहे की, यामुळे पृथ्वीला कुठलाही धोका नाही. नासाने याला “नियर अर्थ ऑब्जेक्ट्स’च्या यादीत ठेवले आहे. हा लघुग्रह 20,000 किमी प्रति तास वेगाने प्रवास करत आहे. हा लघुग्रह ज्यावेळी पृथ्वीला क्रॉस करेल त्यावेळी खूप जास्त दूर असेल असे सांगण्यात आले आहे.