मंचर (प्रतिनिधी) – वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) करोनाचे हॉस्पॉटच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यामुळे गावात खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामस्थांनी गावाकडे येणारे सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट उभारले असून तेथे ग्रामसुरक्षा दलातील तरुण पहारा देत आहे.
वडगाव फाटा -सुलतानपूर-वायकरमळा रस्ता, चिंचोडी-शेटेमळा, दत्तमंदिर रोड, भैय्ये मळा शिव या सर्व चेकपोस्टवर कडक पहारा दिला जात आहे. एका चेक पोस्टवर 10 तरुण नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना अटकाव होणार आहे.