कराड -कराड तालुक्यात आर्थिकदृष्ष्6या मोठी असलेल्या उंब्ररज ग्रामपचांयतीमध्ये तीन लाख 80 हजार 125 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीचा करवसुली लिपिक उत्तम रामचंद्र कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी दिला आहे. हा लिपिक सरपंच लता कांबळे यांचा पती आहे. या आदेशामुळे उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित आदेश 27 मार्च देण्यात आला असतानाही अजून गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या आदेशात म्हटले आहे की, उंब्रज ग्रामपंचायतीत उत्तम कांबळे हे गेल्या 20 वर्षांपासून वसुली क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. त्यांया पत्नी लता कांबळे च्या सरपंच आहेत. उत्तम कांबळे यांनी 2016-17 मधील करवसुलीची रक्कम दोन लाख 15 हजार 581 व 2017-18 मधील करवसुली एक लाख 64 हजार 544 रुपयांचा भरणा बॅंकेत केला नाही. कांबळे हे वॉर्ड 2 मधील खातेदारांचे नमुना 8 व 9 प्रमाणे वसुली काम पाहत आहेत. त्यांनी खातेदारांकडून वसूल केलेली रक्कम नमुना नं. 9 ला नोंदवून नमुना नंबर 10 प्रमाणे खातेदारांना बोगस पावत्या दिल्या आहे. या वसुली रकमेत तफावत आहे.
नमुना नं. 10, पुस्तक क्र. 27 मध्ये 2016-17 मध्ये 86 खातेदारांची दोन लाख 15 हजार 581 तर पुस्तक 8/9 मधील 44 खातेदारांची 2017-18 मध्ये एक लाख 64 हजार 544 रुपये रक्कम जमा करण्यात आली नाही. वॉर्ड 3 मधील खातेदारांकडून करवसुली करण्याचा आदेश, नमुना नं. 15, स्टॉक रजिस्टरमधील पुस्तकांबाबतच्या नोंदी नमुना नं. 10 प्रमाणे करण्यात आल्या नाहीत. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता, मालमत्ता व निधीचा अपहार, मूळ दस्तएवजांमध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश किंवा फेरफार केल्याप्रकरणी उत्तम कांबळे सकृतदर्शनी दोषी आढळल्याने त्यांच्यावर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नियमानुसार गुन्हा दाखल करावा.