कराड -येथील कृष्णा हॉस्पिटलमधील करोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेले आणखी चार रुग्ण करोनामुक्त झाले. या रुग्णांना मंगळवारी टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत एकूण 60 रुग्ण करोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
म्हासोली येथील 60 वर्षांचा पुरुष, मलकापूर येथील नऊ वर्षांची मुलगी, उंब्रज येथील 22 वर्षांचा युवक आणि 53 वर्षांची व्यक्ती, अशा चार करोनामुक्त रुग्णांना आज मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आनंद गुडुर, डॉ. रश्मी कणवीकर-गुडुर, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या हस्ते या करोनामुक्त रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.