पुणे – शहरात आजही नवीन करोनाबाधित संख्या 246 असून, बाधितांची एकूण संख्या 5 हजार 427 वर गेली आहे. मंगळवारी दिवसभरात 2 हजार 44 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
मंगळवारच्या बाधितांमध्ये 208 डॉ. नायडू रुग्णालयातील असून, 5 ससून तर खासगी रुग्णालयातील 33 जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 176 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 44 जण व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 140 जणांना घरी सोडले. डॉ. नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये 1 हजार 571 बाधित उपचार घेत आहेत. ससूनमध्ये 155 तर खासगी रुग्णालयात 553 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
आणखी 9 मृत्यू
गेल्या 24 तासांत ससूनसह पूना, रुबी, दीनानाथ, यश आणि हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एकूण 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये ससून-4 तर अन्य रुग्णालयांत प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. 30 आणि 41 असे दोघे सोडले, तर अन्य सर्व वयवर्षे 50 ते 82 या वयोगटातील असून, येरवडा, हडपसर, कॅम्प, पर्वती, नाना पेठ, येथील रहिवासी आहेत.