पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील 2 हजार 275 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.177 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील 4 हजार 123 बाधीत रुग्ण असून 2 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव रुग्ण संख्या 1 हजार 903 आहे. करोनाबाधित एकूण 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 166 रुग्ण गंभीर आहेत. सातारा जिल्ह्यातील 138 करोनाबाधित रुग्ण असून 69 रुग्ण बरे झाले आहेत. 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 390 करोनाबाधीत रुग्ण असून 150 रुग्ण बरे झालेत. तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात 50 करोनाबाधीत असून 32जण बरे झालेत. एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 43 पैकी 10 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 14 लाख 65 हजार 859 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 92 लाख 30 हजार 712 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 80 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण
पुणे विभागामध्ये दि.10 ते 18 मेपर्यंत परदेशातून एकूण 476 व्यक्तींचे आगमन झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 377 लोकांचा समावेश आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे.