सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस सलमान खान फिल्मस आपल्या आगामी चित्रपटांचे कास्टिंग करीत आहेत. जेव्हा ही गोष्टी उघडकीस आल्या तेव्हा सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्पष्ट केले होते की, सलमान खान फिल्म्स ना कुठल्याही चित्रपटासाठी कास्टिंग करीत आहे किंवा आगामी चित्रपटांसाठी कास्टिंग एजंटला नेमले आहे.
हे प्रकरण अभिनेता अंश अरोरा यांचे असून त्यांना सलमान खान फिल्म्सकडून बरेच कॉल, मेसेजेस आणि ईमेल आले आहेत. यात सलमान खानच्या आगामी “टायगर जिंदा है 3′ या चित्रपटात त्याला खलनायाकच्या भूमिकेची ऑफर देण्यात आल्याचा उल्लेख आहे. या व्यतिरिक्त ईमेलमध्ये दिग्दर्शक प्रभुदेवाबरोबर भेट करून देण्याचाही उल्लेख आहे.
यानंतर अंश अरोराने सलमान खान फिल्म्सविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अंश अरोराचे म्हणणे आहे की, माझी फसवणूक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आगामी प्रॉजेक्ट्ससोबत कटकारस्थान करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात आपल्याला कोणताही ईमेल किंवा संदेश मिळाल्यास, त्यावर विश्वास ठेवू नका, असा खुलासा सलमान खानने केलेला आले. तसेच कोणी सलमान खान फिल्म्स किंवा माझ्या नावाचा गैरवापर करत असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्याने स्पष्ट केले आहे.