मुंबई : जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील 24 तासात 88,987 नवीन कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. तर 24 तासात 4,248 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 80 हजार 224 वर पोहोचली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 41 लाखांवर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 14 लाख 36 हजार 206 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 29 लाख 90 हजारांवर कोरोना रुग्ण आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,347,309 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 80,037 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
यूकेत 31,587 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 215,260 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 26,478 लोकांचा मृत्यू झालाय. 262,783 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,395 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 218,268 इतका आहे.