मेष : व्यवसायात सतत खेळत्या भांडवलाची गरज भासेल.
वृषभ : कामाचे वर्गीकरण व महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
मिथुन : मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याकडे कल राहील
कर्क : विचारांचा गोंधळ संपून तुम्ही काही ठोस निर्णय घ्याल.
सिंह : अंथरूण पाहून हातपाय पसरा
कन्या : अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने आश्चर्याचा धक्का.
तूळ : कामात चांगली कलाटणी मिळेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन कामांमुळे दगदग वाढेल.
धनु : ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचा प्रत्यय येईल.
मकर : जिद्द व चिकाटीच्या जोरावर कामात प्रगती कराल.
कुंभ : व्यवसायात केलेल्या कष्टाचे फळ मिळणारच.
मीन : योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा.