येरवडा (प्रतिनिधी) – संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या सुचनेनुसार सैन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून करोना वॉरियर्सबद्दल कृतज्ञताव्यक्त करण्यासाठी पुणे पोलिसांच्या खडतकर व उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे सन्मान करण्यात आला.
बीईजी सॅपर्सचे कंमांडट सेना एम.जे.कुमार यांनी हा सन्मान तसेच भेटवस्तू देऊन केला. पुणे पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक पंकज देशमुख यांनी हा सन्मान व भेटवस्तू स्वीकारला.
यावेळी बीईजीचे वरिष्ठ लष्करी अधिकारी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद कदम, सहा.पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते उपस्थित होते.