मुंबई – अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे आज (दि. 30) मुंबईत निधन झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला.
ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव ‘ऋषी राज कपूर’. द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे ते पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते नातू. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते.