पुणे (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे शहरातील लहान व्यवसाय ठप्प आहेत. परिणामी सहकारी बँका आणि पतसंस्था मध्ये या व्यावसायिकाच्या अल्पबचत खात्याच्या दैनंदिन रकम्मेचे दुकानात जाऊन संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटवर उपासमारीची वेळ आली आहे. बचत खात्याचा निधी संकलित झाला तरच या एजंटना त्यात बँकेकडून 1 ते दीड टक्के कमिशन मिळते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र , लॉकडाऊन पासून हे निधी संकलन बंद असल्याने शहरातील शेकडो पिग्मी एजंटवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी शेकडो एजंट करत आहेत.
शहारत मोठ्या प्रमाणात सहकारी बँका तसेच पतसंस्था आहे.त्यांच्याकडून लहान व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कर्ज तसेच बचतखात्यावर जादा व्याज दिले जाते. त्यामुळे लहान व्यवसायिकांनी या बँकांकडे मोठ्या प्रमाणात बचतखती काढली आहेत. त्यात हे व्यावसायिक दररोज आपल्या जमा झालेल्या पैशातून काही ठराविक रक्कम बँकेत जमा करतात. पण प्रत्येक वेळी बँकेत जाणे शक्य नसल्याने ही रक्कम घेण्यासाठी बँकांनी पिग्मी एजंट नेमले आहेत. ते दररोज दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ही बचतीची रक्कम संकलित करतात. या जमा रकमेच्या कामापोटी त्यांना बँकेकडून 1 ते दीड टक्के रक्कम मोबदला म्हणून दिले जाते. त्यातच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तर काही जण या कामसह लहान मोठे व्यवसाय करतात. मात्र, लॉकडाऊन नंतर बँक कलेक्शन तसेच त्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत.
त्यामुळे पिग्मी एजंटच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हे एजंट शहारत विखुरलेले असल्याने त्यांची संघटना नाही त्यामुळे शासनाकडे त्यांची बाजू मांडण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यातच, ज्या बँकांचे ते काम पहातात. त्याच्याकडे मदतीची विनंती केल्यास त्यांच्याकडून कामच बंद केले जाण्याची भिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर कामही असणार नाही. त्यामुळे हे एजंट आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शासनाने बँकांना सूचना द्याव्यात…
आपल्या सह इतर काही एजंटवर आलेली उपासमारीची व्यथा एका पिग्मी एजंटने नाव न छापण्याच्या अटीवर मांडली. आम्ही ज्या बँकांसाठी काम करतो त्यांनीच आम्हाला मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही विचारणा केली तर आमचे हातातले कामही जाईल. त्यामुळे असंघटित कामगारां प्रमाणे आम्हलाही मदत मिळावी. त्यासाठी शासनाने पतसंस्था आणि सहकारी बँकांना आदेश दिल्यास या कठीण काळात आम्हाला मोठी मदत होईल.