इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये करोना व्हायरस वेगाने पसरत असूनही कट्टरपंथीय उलेमाच्या आग्रहाखातर तेथील मशिदी उघडण्यात आल्या आहेत. अशामध्येच आता एका पाकिस्तानी मौलानांनी महिलांच्या कपड्यांमुळेच करोना पसरल्याचा अजब दावा केला आहे. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते.
पाकिस्तानच्या प्रसिद्ध कट्टरपंथी मौलाना तारिक जमील म्हणाले कि, महिलांनी लहान आणि तोकडे कपडे घातल्याने तसेच त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामुळे जगाला ही शिक्षा भोगावी लागली आहे आणि करोना विषाणू हादेखील त्याचाच परिणाम आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
जमील पुढे म्हणाले की, काही टीव्ही वाहिन्यांनी माझ्या वक्तव्याप्रकरणी मी माफी मागितल्याची खोटे वृत्त दाखवत आहेत. मी जे काही बोललो त्यासाठी मी माफी मागणार नाही, असेही त्यांनी सांगतिले. जमील यांच्या वक्तव्यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
दरम्यान, मौलाना जमील यांच्या वक्तव्यावर पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने टीका केली असून त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे.