देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे सध्या आपल्या घरी विश्रांती घेत आहे. अन्य स्टार्सप्रमाणे राधिकाही सोशल मीडियावर सतत ऑक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
राधिकाने नुकताच आपला एक थ्रोबॅक बिकिनी फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटोत ती एका शिपवर पोलका डोटेड बिकिनीत खूपच हॉट अशी दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत राधिकाने एक कॅप्शनही लिहिली आहे. यात राधिका म्हणते, हा लॉकडाऊनचा काळ खूपच सुंदर आहे. राधिकाचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यावर लाखो चाहते कॉमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहे. तसेच अनेकांनी हा फोटो री-पोस्ट देखील केला आहे.
https://www.instagram.com/p/B_PLaeyHYEC/
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास राधिका सध्या लॉकडाऊनमध्ये आराम करत आहे. या मराठमोळी अभिनेत्रीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळमसह अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धम्माल केलेली आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून राधिकाने आपली ओळख निर्माण केलेली आहे.