रायबरेली – करोनाप्रभावित क्षेत्रांना हॉट स्पॉटच्या स्वरूपात चिन्हांकित करून कोरोना संक्रमणाच्या बचावासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारतर्फे अवलंबिण्यात आलेल्या रणनीतीची संपूर्ण देशात प्रशंसा करण्यात येत आहे. मात्र, रायबरेली जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन होममध्ये व्हिडिओ व्हायरल करून तेथील बदहाली चव्हाट्यावर आणली आहे. यामुळे योगी सरकारची चांगलीच पोलखोल केली आहे.
Video is From Raibareli in Uttar Pradesh
Yesterday Govt promised better facilities for Doctors
Situation is worst for Doctors in some areas#COVIDー19 #coronavirus @ndtv pic.twitter.com/aBMdyvfaTf
— सैयद Maroof علی (@SayyadAli99) April 23, 2020
सोशल मीडियावर वायरल व्हिडियोमध्ये रायबरेली जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एका शाळेत क्वारंटाईन होम बनवण्यात आले आहे. येथे डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र ही सोय पाहता कोणीही येथे राहण्यास धजावणार नाही अशी कठीण परिस्थिती आहे. एकाच खोलीत चार जणांना कोंबण्यात आले आहे. खोल्यांमध्ये असलेले पंखे बंद आहेत. शाळेत वीज कधीतरी येथे. रात्रीच्या वेळी कायम अंधाराचे साम्राज्य असते. सगळ्यांसाठी कॉमन बाथरूम आणि शौचालय आहे ते देखील वापरण्याजोगे नाही. जेवणासाठी पुरी भाजी चे पाकिट देण्यात येते. सगळ्या कर्मचाऱ्यांना पाहण्यासाठी फक्त वीस लिटरचा जार देण्यात आला आहे. दरम्यान, क्वारंटाईन होमची पोल खोल होतास दरदरून घाम फुटलेल्या योगी सरकारने तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या.