नवी दिली : भारतातील सर्वात मोठी निमलष्करी दलाचा सीआरपीएफचा पदवीदान समारंभ प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला. या समारंभाचे आयोजन शुक्रवारी सीआरपीएफच्या खादरपूर येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये होणार आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भावी अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. तसेच यावेळी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश यावेळी अधिकाऱ्यांना ऐकवण्यात येणार आहे.
सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) ए. पी. माहेश्वरी दिल्लीस्थित सीआरपीएफच्या मुख्यालयातून जवानांशी संवाद साधणार आहेत.
चार महिला अधिकाऱ्यांसोबतच ४२ राजपत्रित अधिकारी गुरुवारी सकाळी १० वाजता गुरगावमधील खदरपूर गावात असलेल्या त्यांच्या प्रशिक्षण अकादमीच्या सभागृहात देश सेवेची शपथ घेतील. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक (सीआरपीएफ) मोसा दिनकरन यांनी सांगितले कि, ५१ बॅचच्या अधिकाऱ्यांचा पदवीदान समारंभ कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशिक्षण केंद्रातच करण्यात येणार आहे. पदवीदान समारोपावेळी लॉकडाऊनच्या नियमांचे पुरेपूर पालन करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.