सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या ४२ संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर शनिवारी रात्री उशीरा ३ संशयित विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे ९, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारे १७, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील दाखल ७, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ७, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील १ व वाई ग्रामीण रुग्णालयातील १ अशा एकूण ४२ संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच काल दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ३ जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.