मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा परिस्थितीत सगळ्याच कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसमोर सुद्धा मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत.
या पडद्यामागील कलाकारांमध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईल, स्पॉटबॉय आदींचा समावेश येतो. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील फोटोग्राफर्स ही येतात. सध्या सगळच बंद असल्याने या फोटोग्राफर्सकडेही काम नाही आहे. अश्या फोटोग्राफर्सच्या मदतीसाठी बॉलिवूड दिग्दर्शक/निर्माते ‘रोहित शेट्टी’ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
रोहित शेट्टी यांनी या फोटोग्राफर्सच्या अकाउंट्समध्ये काही रक्कम ट्रान्स्फर केली आहे. अशी माहिती चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर योगेश शाह यांनी आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत रोहित यांचे आभार मानले.