लॉकडाऊनमुळे सध्या बॉलीवूडमधील सर्व स्टार कलाकार आपआपल्या घरी आहेत. मात्र, आलिया भट्टबाबत आलेल्या एका वृत्तामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. ते असे की, आलिया भट्ट एका हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार होती. ज्याचे दिग्दर्शन दिनेश विजन करणार होते. पण, आलियाने या चित्रपटास नकार दर्शविला आहे.
निर्माता दिनेश विजन यांनी आपल्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी आलिया भट्टला अप्रोच केले होते. यासाठी त्यांनी आलियाची भेट सुद्धा घेतली होती. मात्र, या चित्रपटातून आलियाने काढता पाय घेतला आहे. कारण आलियाकडे यापूर्वीच अनेक चित्रपटाचे शूटिंग डेट्स निश्चित असल्याने ती खूपच व्यस्त आहे. त्यातच करोनामुळे लॉकडाउन असल्याने तिने चित्रपट नाकारला.
दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती सध्या “गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र, करोना व्हायरसमुळे ते बंद करण्यात आले आहे. याशिवाय ती “ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसह झळकणार आहे.