नगर – प्रेरणा प्रतिष्ठानाचे कार्य नगरकरांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले. करोनासारख्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या नगरकरांसाठी प्रेरणातर्फे सुरु करण्यात आलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे काम पथदर्शी असून, त्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याची भूमिका नगरमधील उद्योजक नरेंद्र फियोदिया यांनी व्यक्त केली.
प्रेरणा प्रतिष्ठानच्या “घरपोच किराणा’ उपक्रमात फिरोदिया परिवाराने आज जीवनावश्यक साहित्य व किराणा भेट देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार जगताप यांनी ही भेट स्वीकारली.
विक्रम फिरोदिया व आशाताई फिरोदिया यावेळी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, “”करोनाच्या विषाणूस रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केला.
प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. त्यातून आधार मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र, या उपक्रमात एका कुटुंबाची दहाच दिवसांची व्यवस्था होईल, अशी तरतूद करण्यात आली. आता लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढल्यास नव्याने मोहीम सुरु करावी लागेल. त्यात सर्वांच्याच मदतीची गरज लागेल.
आमदार संग्राम जगतापप्रवर्तक, प्रेरणा प्रतिष्ठान, नगर