लातूर : राज्यात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, असे असताना मराठवाड्यातून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. लातूरमधील आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची फेरतपासणी करण्यात आली. त्यातील तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत पाच जणांचे रिपोर्टही लवकरच निगेटिव्ह येतील आणि लातूरचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर येईल, असा आशावाद वैद्यकीय उपचार करणाऱ्या पथकाने व्यक्त केला आहे.