वॉशिग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पुरवल्याबाबत आभार मानले आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला आहे.
Extraordinary times require even closer cooperation between friends. Thank you India and the Indian people for the decision on HCQ. Will not be forgotten! Thank you Prime Minister @NarendraModi for your strong leadership in helping not just India, but humanity, in this fight!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 8, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘संकटाच्या काळात मित्रांना मदत करण्याची गरज असते. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध पुरवण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे भारत आणि भारताच्या लोकांचे आभार. ट्रम्प यांनी पुढे लिहिले आहे की, आम्ही ही मदत कधीच विसरणार नाही. ट्रम्प यांनी मोदींना टॅग करत पुढे लिहिले आहे की, कोरोन विरूद्धच्या या लढाईमध्ये मोदी फक्त भारताची नाहीतर मानवतेची मदत करत आहेत. यासाठी ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले आहेत
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली होती. परंतु आता हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पुरवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे.