पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना नागरिकांनी लॉक डाऊनचे सर्व नियम पाळून रविवारी रात्री घराबाहेर न पडता आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन शहराचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. तसेच जे कोणी लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
रविवारी रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करुन बाल्कनीत पणती, दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे़. त्याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ़ शिसवे यांनी सांगितले की, पुणे शहरासह देशभरात लॉक डाऊन सुरु आहे़. संचारबंदी असल्याने पुणेकरांनी घराबाहेर न पडता बाल्कनी येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्यात़ यासंबंधीचे आवाहन शहरातील स्मार्ट सिटीच्या पी ए सिस्टीम, पोलीस व्हॅन, तसेच वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांमार्फत करण्यात येत आहे़. दरम्यान या कालावधीत रस्त्यावर येणाºया नागरिकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील़ तसेच वाहने जप्त केली जाणार आहेत़.