बेल्हे -जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेची वाहतूक वगळता कोणत्याही व्यक्तीला जिल्हा बदलण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याने आळेफाटा (ता. जुन्नर) पोलीस ठाण्याच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिवसभर भर उन्हात आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी कर्मचाऱ्यांबरोबर पुणे-नाशिक सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.