लंडन – हवामान बदल विषयक “कोप-26′ ही संयुक्त राष्ट्राची परिषद सध्याच्या करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभुमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिषद स्कॉटलंडमधील ग्लासगो इथे होणार होती, असे ब्रिटन सरकारने जाहीर केले.
“नोव्हेंबर 2020 मध्ये एक महत्त्वाकांक्षी, सर्वसमावेशक “सीओपी 26′ ही परिषद करोनाच्या साथीच्या वातावरणात घेणे शक्य नाही, असे ब्रिटीश सरकारने म्हटले आहे. या परिषदेचे 2021 मधील नवीन वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
या परिषदेला जगभरातील 200 नेते आणि 30 हजार नागरिक उपस्थित राहणार होते. जागतिक तापमानवाढीच्या मुद्दयावर या परिषदेत चर्चा अपेक्षित होती. 2030 पर्यंत जागतिक कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 45 टक्क्यांनी कमी कररणे आणि 2050 पर्यंत हे प्रमाण शून्य करणे आवश्यक असल्याचा ठराव पॅरिस करारात केला गेला आहे.