रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील आसखेडचा पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. या ठिकाणी डॉक्टर वेळेत कामावर हजर राहत नसून त्यांच्या जागी सेवा निवृत्त मद्यपी डॉक्टर पशुधनावर उपचार करीत आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील हा प्रकार पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता उघडकीस आला. येथे कार्यान्वित असलेल्या डॉक्टरवर कडक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस देण्यात आले असल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
याबाबतची माहिती अशी कि, दि.२३ रोजी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांच्यासह अधिकाऱयांनी आसखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली त्यावेळी या दवाखान्यातील हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या दवाखान्यातील नियुक्तीला पशूवैद्यकीय अधिकारी डॉ आर टी दिवटे हे कोणतीही सूचना न देता गैरहजर होते. तर दवाखान्यात मद्यधुंद व्यक्ती डॉ पांडुरंग पवार हि दवाखाना चालवत असल्याचे समोर आले. ते राहत असलेल्या येतील दवाखाण्यातील निवासात चौकशी केली असता तेथे दारूच्या बाटल्या सापडल्या. अधिकारी पदाधिकरी यांनी गावातील नागरिकांशी याबाबतच चर्चा केली असता येथील डॉ दिवटे हे दवाखाण्यात गेली अनेक दिवस येत नसल्याचे सांगितले. अजून धक्कादायक बाब म्हणजे दवाखान्यात डॉ पांडुरंग पवार हे पशुधनावर उपचार करत असल्याची बाब समोर आल्यानंतर अधिकारी व पदाधिकारी अवाक झाले.
डॉ पांडुरंग पवार हे २ वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झाले आहेत मात्र येथील डॉ दिवटे यांच्या निवास्थानात अनधिकृतपणे राहत आहेत. ते नेहमी मद्यधुंद अवस्थेत असतात व स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून पशुधनावर उपचार करीत असल्याचे समोर आले आहे. शिवाय मद्यधुंद अवस्थेत वावरताना दिसत असल्याने हि गंबीर बाब बनली आहे.गेली दोन वर्षे हा प्रकार सुरु असून हे येथील कार्यान्वित डॉक्टर आर टी दिवटे यांच्या पूर्वपरवानगीने सूर असल्याने डॉ दिवटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे याबरोबरच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आर टी दिवटे हे मुख्यालयात राहत नाहीत त्याचा विपरीत परिणाम होत आहे दवाखान्यात सुरु असलेला हा प्रकार माहिती असुनही त्यांनी जाणीवपूर्वक तो वरिष्ठांना कळवलेला नाही. डॉ दिवटे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे कलम ३ चा भंग केला आहे. याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे दोन दिवसात खुलासा केला नाही तर निलंबित करण्याचा आदेश देण्यात गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिला आहे.
याबाबत पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले कि, आसखेड येथील पशुवैयद्यकीय अधिकारी दवाखान्यात गैरहजर राहत असून त्यांच्या निवासात पांडुरंग पवार हे वास्तव्यास असून मीच डॉक्टर असल्याचे सांगत आहेत. ते मद्यधुंद अवस्थेत अनाधिकृत येथे राहत असून दारूच्या बाटल्या दवाखान्याच्या परिसरात पडलेल्या आहेत. डॉ दिवटे यांनी डॉ पांडुरंग पवार यांना सांभाळायला दिले असून ते खाजहि अतिशय धक्कादायक बाब आहे. डॉ दिवटे यांना आपल्या नोकरीचे भान नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्याजागी गरजू अधिकाऱ्याला संधी दिली जाईल. पशुधनाची काळजी घेण्यासाठी डॉ दिवटे यांचा बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे मुख्याधिकारी आयुष्य प्रसाद व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन काळात कोणी कामचुकार पणा केला तर त्यांचे खैर केली जाणार नाही.
करोना विषाणूंचा प्रसार होत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात पुणे मुंबईला राहणारे अनेकजण गावात आले आहेत. करोना विषाणू वाढू नये यासाठी त्यांची नोंद ग्रामपंचायत पातळीवर ठेवली जाते. यासाठी ग्रामसेवकांमधें जबाबदारी आहे असे असताना तालुक्यातील ४ ग्रामसेवक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर विनावेतन व त्यांची इन्क्रिमेंट रोखण्याचा प्रस्ताव तयार करून कारवाई केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन काळात अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे मुख्यालयात कार्यन्वित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे सभापती राक्षे यांनी आवाहन केले आहे.