पुणे- सध्या कोरोनाची लागण रोखण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातच कलाकारांनी नवीन शक्कल लढवली आहे. कुणी इन्स्टाग्रामवर गाण्याच्या भेंड्या खेळत आहे तर कुणी गाणं लिहत आहे. एकंदरीत सगळे आपले जुने छंद जोपासताना दिसत आहे.
प्रभाकर मठपती या विद्यार्थ्यांने असाच छंद जपत, कोरोनावर एक गाणं रचलं आहे. सध्याच्या परिस्थितीला शोभेल असं हे गाणं आहे. हा तरुण पुण्याच्या ललित कला केंद्रात कलेचं शिक्षण घेत आहे.
दरम्यान, परिस्थिती कशीही आली तरी कलाकार कंटाळत नाही ते नवीन काय करता येईल याचा नेहमी प्रयत्न करत असतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.