पुणे : जगभरात करोना व्हायरसचा विळखा पसरत चालला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात ही संख्या १४७ वर पोहचली आहे पुण्यातील नायडू रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन करोनाग्रस्तांसाठी सातत्याने कष्ट घेणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर्स आणि इतर सगळ्यांचं मनोधैर्य उंचावणारा ठरला. हॅलो सिस्टर, नमस्ते तुम्ही कशा आहात? अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया यांच्याशी संवाद साधला.