जेम्स बॉंड या चित्रपट मालिकेवर प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केले. हे काल्पनिक पात्र लोकांना वास्तववादी असल्याचा आभास निर्माण करून गेले. याचे श्रेय कथानक, निर्माते-दिग्दर्शक याबरोबरच हे पात्र साकारणाऱ्या कलाकारांचेही आहे. त्यामुळे ‘जेम्स बॉंड’चा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे.
दरम्यान, आता जेम्स बॉंड चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे जेम्स बॉंड चित्रपटात वापरल्या गेलेल्या पाच बंदुका चोरटयांनी लंपास केल्या आहेत. अशी माहिती ब्रिटिश पोलिसांनी शुक्रवारी दिली. तसेच, चोरी केलेल्या या सर्व बंदुका डीअॅक्टीव्ह असल्याचे सुध्या यावेळी पोलिसांनी सांगितले.
उत्तर लंडन भागातील एका इमारतीत या बंदुका ठेवल्या गेल्या होत्या. या बंदुकांची आजच्या भावाने बाजारातील किंमत 1लाख पौंड म्हणजे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, चोरीस गेलेल्या बंदुकात ‘डाय अदर डे’ चित्रपटात वापरली गेलेली बेरीटा चिता पिस्तोल, एक लेझर/ सायलेन्सर अॅटॅचमेंट व 1लामा 22 सह बेरेटा टॉमकॉट पिस्तुल आहे.
जेम्स बॉंड सिरीज ‘ए व्ह्यू टू ए किल’ मध्ये वापरलेल्या वॉल्टर पीपीके बंदूक, ‘लिव्ह अँड लेट डाय’ मध्ये वापरलेले स्मिथ अँड वेस्टन 44 मॅग्नम रिव्होल्व्हर यांचाही चोरीला गेलेल्या बंदुकात समावेश आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, हे रीवोल्व्हर असे एकमेव आहे ज्यात त्याचे पूर्ण फिनिशिंग क्रोम मध्ये केले गेले आहे. त्याला साडेसहा इंचाचे बॅरल आणि लाकडी मुठ आहे.