जगदलपूर – छत्तीसगडच्या येथील सुकमा परिसरात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात झालेल्या चकमकीत तीन सैनिक ठार झाले आहे. तर 14 जवान जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
Chhattisgarh: 14 District Reserve Guard (DRG) jawans who sustained injuries in an encounter with naxals in Sukma earlier today, have been airlifted to Raipur and being brought to Ram Krishna Hospital. https://t.co/32WSh60mIM pic.twitter.com/FAcwMUhpT5
— ANI (@ANI) March 21, 2020
या चकमकीत सहा नक्षलवादीही मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये बरेच नक्षलवादी जखमी झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. सैनिकांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी सैनिकांना रायपूर इथल्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.