मुंबई – वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (थकज) ने करोना विषाणू जागतीक साथ म्हणून जाहीर केले आहे. करोना विषाणूमुळे बरेच इव्हेंट्स, अवॉर्ड फंक्शन्स, मुलाखती आणि शूटिंग रद्द करण्यात आले आहे. आता याबाबत जनजागृती करण्यासाठी मराठी कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
#TatyaVinchu On #CoronaVirus asks people to stop spreading rumours #ramdaspadhye #satyajitpadhye #maheshkothare @abpmajhatv @bbcnewsmarathi @MarathiRT @marathimovies @PlanetMarathi @marathifilmwala @RajshriMarathi @CafeMarathi @LoksattaLive @mataonline @soumitrapote @MiLOKMAT pic.twitter.com/12APsoTRU9
— Satyajit Ramdas Padhye (@satyajitpadhye) March 18, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच थरकाप उडवणाऱ्या महेश कोठारे यांच्या ‘तात्या विंचू’ने त्याच्या अंदाजात लोकांसाठी संदेश दिला आहे. खुद्द महेश कोठारे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ओम भट स्वाहा करूयात या करोना व्हायरसचा’ असं तात्या विंचू या व्हिडीओत म्हणतोय.
महेश कोठारे यांनी शेअर केलेला व्हिडीओ …
‘नमस्कार, ओळखलं का मला.. नाही ओळखलं.. एक मिनिट.. (तोंडावरील मास्क काढून) आता ओळखलं का… नमस्कार.. मी तात्या विंचू..ओम भट स्वाहा.. मेहरबान कदरदान करोना व्हायरससे है पुरी दुनिया परेशान… म्हणून मित्रांनो..आपण सगळ्यांनी मिळून या करोना व्हायरसचा खात्मा करूया.. म्हणजे ओम भट स्वाहा करून टाकूया या करोना व्हायरसला.. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा.. बाहेर जाताना मास्क घाला.. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका… गरज नसताना उगाच बाहेर पडू नका.. आणि सगळ्यात महत्त्वाचं या करोना व्हायरसबद्दल अफवा पसरवू नका.. नाहीतर करून टाकीन ओम भट स्वाहा..’