नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रसार भारतातही वेगाने होत असून आता केरळमध्ये केवळ ३ वर्षाच्या मुलालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.
माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला हा मुलगा ७ मार्च रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह इटलीवरून भारतात परतला होता. सध्या त्याला एर्नाकुलम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.
3-year-old boy tests positive for COVID-19 in Kerala, total cases in India now 40
Read @ANI Story | https://t.co/vQNiZhtDDU pic.twitter.com/oqvoFfduDA
— ANI Digital (@ani_digital) March 9, 2020
दरम्यान, करोना विषाणूची लागण झाल्याची एक लाखाहून अधिक प्रकरणे जागतिक स्तरावर नोंदली गेली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जगभरात 1 लाख 1,727 पुष्टी झालेल्यांपैकी 3,484 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जसारेविक म्हणाले.