मुंबई – एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक ‘सुयज डहाके’ याने एका वादग्रस्त मुद्द्याला वाचा फोडली. “सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?” असा प्रश्न सुजयने विचारला आहे. मात्र, सुजयच्या या वक्त्यावरून मराठी चित्रपटसृष्टीत मोठा वाद रंगला आहे.
दरम्यान, आता सुजयच्या या प्रश्नाला मराठी अभिनेता ‘शशांक केतकर’ने जोरदार उत्तर दिले असून, त्याला एक बोचरा सवालही केला. शशांकने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
शशांक म्हणाला कि, “‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास’, असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं. सोबतच साने आणि मंजुळे हे समीकरण पुरेसं नाहीये का? असा प्रश्न त्याने सुजयला केला.