बॉलीवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटांला घवघवीय यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी ‘आरआरआर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर या शीर्षकाचे रहस्य उलगडले आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाचा फुलफॉर्म ‘रघुपती राघव राजाराम’ असा आहे. याला निर्मात्यांनीही दुजोरा दिला आहे. आरआरआर या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर या दाक्षिणात्य अभिनेत्यांसह आलिया भट्ट आणि अजय देवगनही झळकणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त ओलिविया मॉरिस, रे स्टिव्हनसन आणि ऍलिसन डूडी हे विदेशी कलाकारही असणार आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील, 1920 च्या काळातील कथा यामध्ये दाखवली असणार आहे. अलुरी सितारामा राजू आणि कोमाराम भीम या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावरील या कथेमध्ये एनटी रामराव ज्युनिअर हे कोमाराम भीम यांच्या भूमिकेत तर राम चरण हे अलुरी सितारामा राजू यांच्या भूमिकेत असणार आहेत. आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. राजामौलींसोबत अजयनची घनिष्ठ मैत्री आहे या मैत्रीसाठीच अजयनं मानधन घेण्यास नकार दिल्याचं समजत आहे.
दरम्यान, “आरआरआर’ हा सिनेमा पुढच्या वर्षी 8 जानेवारीला तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. एकूण 10 भाषांमध्ये “आरआरआर’ रिलीज होणार आहे.