आमिर खान आणि करीना कपूर सध्या “लालसिंग चढ्ढा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हॉलिवूडमधील 1984 सालच्या “फॉरेस्ट गम्प’ची बॉलिवूड आवृत्ती असलेल्या या सिनेमातील एका रोमॅंटिक गाण्याचे शूटिंग अलीकडेच पंजाबमध्ये करण्यात आले.
आमिर आणि करीना “थ्री इडिएट’नंतर प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री अफलातून होती.
ही केमिस्ट्री इतकी परिपक्व होती की, आपल्याला “कट’ म्हणावेसेही वाटले नाही, अशा शब्दात डायरेक्टर अद्वैत चंदनने या दोघांचे कौतुक केले. “जुगनू’ हे गाणे प्रेक्षकांसमोर जितक्या लवकर आणता येईल, तितक्या लवकर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले.
“लालसिंग चढ्ढा’च्या महत्त्वाच्या भागाचे शूटिंग पंजाबमध्येच झाले आहे. याशिवाय देशभरात तब्बल 100 ठिकाणी या सिनेमातल्या वेगवेगळ्या दृश्यांचे शूटिंग झाले आहे. “थ्री इडिएट’मधील “झूबी डूबी’ या रोमॅंटिक गाण्यातही आमिर आणि करीनाची केमिस्ट्री दिसून आली होती. “लालसिंग चढ्ढा’ 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. यावर्षीचा आमिरचा हा बिग बजेट सिनेमा अगदी वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार आहे.