अंकारा : तुर्कीच्या व्हॅन प्रांतात भूकंपात सात जण ठार तर, पाच जण जखमी जखल्याची माहिती मिळते आहे. रविवारी स्थानिक प्रसार माध्यमांनी ही माहिती दिली. भूकंपाचे केंद्रस्थान इराणमध्ये असल्याची माहिती तुर्कीच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. भूकंपाची तीव्रता 7.7 नोंदवली गेली .
एका स्थानिक वृत्तवाहिनीने गृहमंत्र्यांच्या हवाला देत सांगितले की, इराणमधील भूकंपात तुर्कीच्या व्हॅन प्रांतात तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भूकंपात पाच जण जखमी झाले आहेत . मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे.